बंद

    20.05.2020: राज्यातील करोना आव्हानाचा राज्यपालांकडून आढावा

    प्रकाशित तारीख: May 20, 2020

    राज्यातील करोना आव्हानाचा राज्यपालांकडून आढावा

    · जून-जूलै महिन्यातील करोना आव्हानासाठी सज्ज राहण्याची सूचना

    · बिगर करोना पेशंटची गैरसोय नको

    · करोना योध्यांना प्रोत्साहन देण्याबाबत विचार करावा

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राज्यापुढील करोना विषाणू संसर्गाच्या आव्हानाच्या अनुषंगाने राज्याच्या विविध विभागांच्या पूर्व तयारीचा एका उच्च स्तरीय बैठकीत आढावा घेतला.

    येत्या जून व जूलै महिन्यातील करोना बाधितांची संभाव्य संख्या विचारात घेऊन संपूर्ण राज्यात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

    करोना संकटाचा मुकाबला करताना बिगर करोना रुग्णांची गैरसोय होणार नाही याची विशेष काळजी घेण्याची सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

    मुंबईतील कंटेनमेंट क्षेत्रासाठी काय उपाय योजना करीत आहे याची राज्यपालांनी माहिती घेतली.

    राज्यात एकूण वैदयकीय अधिकारी, नर्सेस, आरोग्य सेवक, इस्प‍ितळातील उपलब्ध खाटा यांची एकत्रित माहिती देणारा डॅशबोर्ड तयार करण्याची राज्यपालांनी यावेळी सूचना केली.

    करोना विरुध्दच्या लढाईत आघाडीवर राहून कार्य करणाऱ्या स्वच्छता कर्मचारी, नर्सेस, आरोग्यसेवक, पोलीस यांना प्रोत्साहन देण्याबाबत शासनाने विचार करावा अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

    राज्यातून मजूरांचे स्थलांतर व स्थलांतरितांसाठी सूरु केलेल्या शिबिरांची सदय:स्थिती याचा देखिल राज्यपालांनी आढावा घेतला.

    यावेळी मुंबई मनपा आयुक्त आय एस चहल तसेच अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) प्रदीप व्यास यांनी सादरीकरण केले.

    बैठकीला मुख्य सचिव अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, सीतराम कुंटे, मनोज सौनिक, नितीन करीर व प्रदीप व्यास, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल तसेच शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.