बंद

    राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राजभवन येथे दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा

    प्रकाशित तारीख: May 21, 2020

    राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राजभवन येथे दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा

    भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या एकोणतिसाव्या पुण्यतिथीनिमित्त आज (दिनांक २१) राजभवन येथे दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली. सुरवातीला दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहण्यात आली.

    राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी राजभवनातील कर्मचारी व अधिकारी, तसेच राजभवन येथील पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाचे जवान व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी व अधिकारी यांनी दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा दिली.

    अहिंसा व सहिष्णुतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.