बंद

  १६.०३.२०२० राजभवन भेट योजना ३१ मार्च पर्यंत स्थगित

  प्रकाशित तारीख: March 16, 2020

  राजभवन भेट योजना ३१ मार्च पर्यंत स्थगित

  दिनांक १७ मार्च ते दिनांक ३१ मार्च २०२० या कालावधीत नागरिकांसाठी राजभवन भेटीची योजना स्थगित करण्यात आली असल्याचे आज राजभवनातून जाहीर करण्यात आले.

  कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले.

  उपरोक्त कालावधीत ज्या लोकांनी राजभवन भेटीसाठी आरक्षण केले आहे, त्यांना कालांतराने राजभवनाला भेट देता येईल, व त्याप्रमाणे त्यांना स्वतंत्रपणे सूचित केले जाईल.