बंद

    ०६.११.२०२१ : राज्यपाल कोश्यारी यांची आपल्या प्राथमिक शाळेला भेट

    प्रकाशित तारीख: November 6, 2021

    ०६.११.२०२१ : उत्तराखंड राज्यातील आपले जन्मगाव असलेल्या नामती चेताबगढ येथे दौऱ्यावर आलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज प्राथमिक विद्यालय चेताबगढ या शाळेला भेट दिली.
    राज्यपाल कोश्यारी यांचे पाचवी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण याच शाळेत झाले. यावेळी राज्यपालांनी शाळेच्या ओसरीवर बसून गतस्मृतींना उजाळा दिला. चेताबगढ हे गाव बागेश्वर जिल्ह्यातील कपकोट तालुक्यात आहे.