बंद

    ०६.११.२०२१ : राज्यपालांनी उत्तराखंड येथील जन्मगावी घेतले माँ भगवतीचे दर्शन

    प्रकाशित तारीख: November 7, 2021

    राज्यपालांनी उत्तराखंड येथील जन्मगावी घेतले माँ भगवतीचे दर्शन

    उत्तराखंड राज्यातील आपले जन्मगाव असलेल्या नामती चेताबगढ येथे दौऱ्यावर आलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज जवळच असलेल्या प्रसिद्ध माँ भगवती मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. चेताबगढ हे गाव बागेश्वर जिल्ह्यातील कपकोट तहसीलमध्ये आहे. पहाडी भागातून अतिशय दुर्गम वाटचाल करून या मंदिरात येताना राज्यपालांचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले.