बंद

  शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यासाठी विमा कंपन्यांची बैठक बोलाविण्याची राज्यपालांची सूचना

  प्रकाशित तारीख: November 5, 2019

  अंतिम दिनांक:31.12.2019

  शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यासाठी विमा कंपन्यांची बैठक बोलाविण्याची राज्यपालांची सूचना

  राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर पिकांच्या नुकसान भरपाईचे दावे तातडीने निकाली काढण्यासाठी संबंधित विमा कंपन्यांची बैठक बोलावण्याची सूचना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज राज्य शासनाला केली.

  कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने आज राज्यपालांची राजभवन, मुंबई भेट घेऊन अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईसंदर्भात एक संदर्भात निवेदन दिले. राज्यपालांच्या सुचनेनुसार सदर निवेदन मुख्य सचिव अजोय मेहता यांचेकडे उपरोक्त सुचनेसह पाठविले.