बंद

  शिवजयंतीनिमित्त राज्यपालांचे शिवरायांना अभिवादन

  प्रकाशित तारीख: February 19, 2019

  छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी आज शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले.

  यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, मुंबईचे महापौर विश्नाथ महाडेश्वर, पालिका आयुक्त अजॉय मेहता व इतर मान्यवर उपस्थित होते.

  त्यानंतर राज्यपालांनी नजिकच्या दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर जाऊन तेथे पुष्पाजंली वाहिली.

  मुंबई महानगरपालिकेने क्रिडा भवन येथे आयोजित केलेल्या शिवजयंती कार्यक्रमास देखिल राज्यपाल उपस्थित राहिले.

  यावेळी महानगरपालिकेच्या संगीत कला अकादमीतर्फे शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.