बंद

    रामनवमीनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा रामनवमी घरीच साजरी करण्याचे राज्यपालांचे आवाहन  

    प्रकाशित तारीख: April 1, 2020

    रामनवमीनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा रामनवमी घरीच साजरी करण्याचे राज्यपालांचे आवाहन

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रामनवमीनिमित्त सर्वांनाशुभेच्छा दिल्या आहेत. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव आनंद आणिउत्साहात साजरा करण्याचा दिवस आहे. मात्र यंदा आपणएका आव्हानात्मक परिस्थितीतून जात आहोत. त्यामुळे रामनवमीचा सण आपल्याला आपल्याघरीच भक्तीभावाने साजरा करायचा आहे. प्रभू रामाचे उन्नत जीवन व उच्च आदर्श मानवजातीला नेहमीच योग्य मार्गाने चालण्याची प्रेरणा देत राहतील. सर्वांना रामनवमीच्याखूप खूप शुभेच्छा देतो, असेराज्यपालांनी आपल्या संदेशामध्ये म्हटले आहे.