बंद

  राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून नीलकंठ खाडीलकर कुटुंबियांचे सांत्वन

  प्रकाशित तारीख: November 22, 2019

  अंतिम दिनांक:31.12.2019

  राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून नीलकंठ खाडीलकर कुटुंबियांचे सांत्वन

  मुंबई, दि. २२ : अग्रलेखांचा बादशहा, ज्येष्ठ पत्रकार आणि नवाकाळचे माजी संपादक नीलकंठ खाडीलकर यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी खाडीलकर यांच्या गिरगाव येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले.राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी खाडीलकर यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वनही केले.

  माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, माजी मंत्री छगन भुजबळ, दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे सहसंचालक तात्याराव लहाने, माजी न्यायमुर्ती बी.जी. कोळसे-पाटील, लेखिका विजया वाड यांच्यासह सर्व क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी खाडीलकर यांचे अंतिम दर्शन घेतले.