बंद

  राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची विवेकानंद कॅन्सर रुग्णालयाला भेट

  प्रकाशित तारीख: October 17, 2018

  महान्यूज

  लातूर दि 16:-विवेकानंद मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर व्दारे संचलित विवेकानंद कॅन्सर रुग्णालयाला मा. राज्यपाल चे.विद्यासागर राव यांनी भेट देऊन येथील कॅन्सर रोगांवरील उपचारासाठी असलेल्या अद्यावत मशनरीची पाहणी केली.

  यावेळी विवेकानंद हॉस्पिटल मध्ये असलेल्या कोबाल्ट व लिनियर एक्सीलेटर मशीनची माहिती विवेकानंद फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. अरुणा देवधर व डॉ.झंवर यांनी माननीय राज्यपाल यांना दिली.

  याप्रसंगी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर,खासदार डॉ सुनील गायकवाड,महापैर सुरेश पवार,जिल्हाधिकारी जी श्रीकांत, अशोक कुकडे,परिविक्षाधीन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय ढगे, उपविभागीय अधिकारी विकास माने, डॉ अनिल आंधोरीकर,डॉ ज्योत्स्ना कुकडे,डॉ दिलीप देशपांडे,डॉ कुलदीप शिरपूरकर, आदी मान्यवर उपस्थित होते.