बंद

    राज्यपाल – अमित शहा भेट

    प्रकाशित तारीख: June 1, 2019

    महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी शनिवारी (दि. १ जून) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. शहा यांची गृहमंत्रीपदावर नियुक्ती झाल्याबद्दल राज्यपालांनी त्यांचे अभिनंदन केले, तसेच महाराष्ट्रातील घडामोडींबद्दल त्यांना माहिती दिली. शुक्रवारी राज्यपालांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची सदिच्छा भेट घेतली होती.