बंद

    राज्यपालांनी साधला कलाकारांशी संवाद

    प्रकाशित तारीख: March 18, 2019

    राज्यपालांनी साधला कलाकारांशी संवाद

    भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या वतीने रविवारी (१७ मार्च) राजभवन, मुंबई येथे संगीत – नाट्य क्षेत्रातील कलाकारांसोबत अनौपचारिक चर्चेचे आयोजन करण्यात आले होते.

    राज्यपाल चे. विद्यासागर राव, परिषदेचे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे व सदस्य विनोद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या चर्चेला ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर, संजीव चिम्मलगी, जयतीर्थ मेवुंडी, शौनक अभिषेकी, निशा पारसनीस, हृषिकेश रानडे, योगेश सम्सी, तौफिक कुरेशी, विजय चव्हाण, नंदेश उमप, कौशल इनामदार, अभिराम भडकमकर, प्रसाद कांबळी, आदिती भागवत, श्रुती भावे, निलेश मोहरील, अतुल परचुरे, दीपिका भिडे, वरद कठापूरकर, प्रथमेश लघाटे यांसह कला क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.