बंद

    राज्यपालांनी केले डॉ. अनिल काकोडकरांवरील चरित्रात्मक पुस्तकाचे प्रकाशन

    प्रकाशित तारीख: February 19, 2020

    ‘अणुविज्ञानातील झंजावात’ या अणुआयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या जीवनावरील चरित्रात्मक पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते बुधवारी राजभवन येथे झाले. डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी लिहिलेल्या व भरारी प्रकाशनतर्फे प्रसिद्ध केलेल्या या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला डॉ अनिल काकोडकर, माहिती आयुक्त सुमित मल्लिक, लेखिका डॉ. मंजुषा कुलकर्णी, पंडितराव कुलकर्णी यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.