बंद

  राज्यपालांच्या हस्ते ‘द इर्टनल मेस्मराइझर’ चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन

  प्रकाशित तारीख: December 17, 2018

  महान्यूज

  दि. 17 डिसेंबर, 2018

  राज्यपालांच्या हस्ते ‘द इर्टनल मेस्मराइझर’ चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन

  मुंबई, दि. 17 : राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते चित्रकार नरेंदर रेड्डी यांनी रेखाटलेल्या गणपती आणि श्री कृष्णाच्या विविध रूपांवर आधारित “द इर्टनल मेस्मराइझर” या चित्रकलांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन आज करण्यात आले. यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी चित्रकार नरेंदर रेड्डी यांना या चित्रप्रदर्शनासाठी आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

  काळाघोडा येथील जहांगीर आर्ट गॅलरीतील हॉल क्रमांक 4 येथे 17 ते 23 डिसेंबर या कालावधीत हे चित्रप्रदर्शन सकाळी 11 ते संध्याकाळी7 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.