बंद

  05.04.2022: राज्यपालांच्या हस्ते कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या ५८ व्या दीक्षांत समारोहात जाहीर झालेल्या राष्ट्रपती सुवर्ण पदक, कुलपती सुवर्ण पदकांचे वितरण

  प्रकाशित तारीख: April 5, 2022

  राज्यपालांच्या हस्ते कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या ५८ व्या दीक्षांत समारोहात जाहीर झालेल्या राष्ट्रपती सुवर्ण पदक, कुलपती सुवर्ण पदकांचे वितरण

  कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या ५८ व्या दीक्षांत समारोहात जाहीर झालेल्या राष्ट्रपती सुवर्ण पदक, कुलपती सुवर्ण पदक तसेच हुतात्मा तुकाराम ओंबळे सुवर्ण पदकांचे वितरण राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज विद्यापीठात झाले. ऐश्वर्या मोरे, स्वाती पाटील तसेच मयुरेश शिखरे यांना अनुक्रमे वरील सुवर्ण पदके देण्यात आली.

  यावेळी कुलगुरू डॉ दिगंबर शिर्के, प्रकुलगुरू पी एस पाटील, विद्यापीठाच्या विविध प्राधिकार मंडळांचे सदस्य, शिक्षक व निमंत्रित उपस्थित होते.

  विद्यापीठाने करोना काळात केलेल्या कार्याचे यावेळी राज्यपालांनी कौतुक केले. इनोव्हेशन, इन्क्युबेशन यांसोबत विद्यार्थ्यांनी आंतरिक शांतीसाठी उत्तम ग्रंथांचे वाचन व नैतिक मूल्यांचे पालन करावे. अध्यापन करताना शिक्षकांनी इंग्रजीसोबत मराठीचा अधिक वापर करावा असे राज्यपालांनी सांगितले.