बंद

  राज्यपालांच्या हस्ते उत्तर पूर्वेतील अप्रसिद्ध गुणवंत नायकांचा गौरव

  प्रकाशित तारीख: November 15, 2019

  अंतिम दिनांक:31.12.2019

  राज्यपालांच्या हस्ते उत्तर पूर्वेतील अप्रसिद्ध गुणवंत नायकांचा गौरव

  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते देशाच्या आठ उत्तर पूर्व राज्यात कला, संस्कृती, उद्योग, क्रीडा शिक्षण, करमणूक या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अप्रसिद्ध गुणवंत नायकांचा सत्कार करण्यात आला.

  मुंबई स्टोक एक्सचेंजच्या आंतरराष्ट्रीय सभागृह येथे झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात राज्यपालांच्या हस्ते नागा सिनेकलाकार रोज लॉंगचार, नवउद्यमी तोयी स्वुरो व ताएक्वोन्डो खेळाडू मेनूदिल्हो मॉरिस उसो यांचा गौरव करण्यात आला.

  यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री सुनील आंबेकर, नेशनल एक्सपरिएंस इन इंटरस्टेट लिविंगचे महासचिव अतुल कुलकर्णी, मुंबई स्टोक एक्सचेंजचे मुख्याधिकारी आशिष कुमार चौहान तसेच पुरस्कार सोहळ्याच्या मुख्य आयोजिका रेबेका सेमा उपस्थित होत्या.