बंद

  राज्यपालांची मणिभवन येथे गांधीजींना आदरांजली

  प्रकाशित तारीख: October 2, 2018

  महात्मा गांधी यांची १४९ वी जयंती

  राज्यपालांची मणिभवन येथे गांधीजींना आदरांजली

  महात्मा गांधी यांच्या एकशे एकोणपन्नासाव्या जयंतीनिमित्त राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी गावदेवी येथील मणिभवन येथील गांधी स्मारकाला भेट देऊन गांधीजींच्या पुतळ्याला आदरांजली वाहिली.

  यावेळी माजी पोलीस महासंचालक ज्युलिओ रिबेरो, मणिभवनच्या अध्यक्षा डॉ. उषा ठक्कर, मानद सचिव योगेश कामदार तसेच गांधी स्मारक निधीच्या अध्यक्षा रक्षा मेहता उपस्थित होत्या.

  राज्यपालांनी महात्मा गांधी यांचा मणिभवन येथील कक्ष पहिला तसेच तेथील ग्रंथालय, संग्रहालय व स्थायी प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी राज्यपालांनी अभिप्राय वहीत आपला अभिप्राय नोंदविला. सन १९१७ ते १९३४ या कालावधीत मुंबई भेटीवर आले असताना महात्मा गांधी यांचा मुक्काम मणिभवन या वास्तूमध्ये असायचा.