बंद

  राजभवनमधील दरबार हॉल व सचिवालय इमारतीचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते पायाभरणी

  प्रकाशित तारीख: December 20, 2018

  महान्यूज

  मुंबई, दि. 20 : राजभवन येथील नव्या दरबार हॉलचे भूमिपूजन तसेच राज्यपाल-सचिवालयाच्या नव्या इमारतीच्या बांधकामाची पायाभरणी राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आली.

  सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, राज्यपालांचे सचिव वेणूगोपाल रेड्डी यावेळी उपस्थित होते. यावेळी दरबार हॉल व राज्यपाल सचिवालयाच्या इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण राज्यपाल चे. विद्यासागर राव व मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी राजभवनातील ब्रिटीशकालीन बंकरची पाहणी केली.

  नव्या दरबार हॉलची क्षमता एकंदर 900 आसनांची असणार आहे. जुन्या दरबार हॉलची क्षमता 250 इतकी होती. नवा दरबार हॉल तसेच राज्यपाल सचिवालय इमारत 31 जानेवारी 2020 पर्यंत बांधून पूर्ण होणार आहे.