बंद

    केंद्रीय आदिवासी राज्यमंत्र्यानी घेतली राज्यपालांची भेट

    प्रकाशित तारीख: October 29, 2018

    केंद्रीय आदिवासी विकास राज्यमंत्री जसवंतसिंह भाभोर यांनी राज्यपाल चे विद्यासागर राव यांची आज (दि २९) राज भवन मुंबई येथे भेट घेतली.

    राज्यात वन हक्क कायदयाची अंमलबजावणी, राज्याच्या अनुसुचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना देण्यात येत असलेल्या थेट निधी वाटपाचे नियोजन तसेच आदिवासी विकासासंबधी इतर प्रश्नांवर यावेळी चर्चा झाली.

    यावेळी राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, सहसचिव सुनिल पाटील तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.