बंद

    ईद उल फित्र निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

    प्रकाशित तारीख: June 15, 2018

    राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी ईद उल फित्र (रमजान ईद) निमित्त राज्यातील लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
    रमजानच्या महिन्यात उपवास, प्रार्थना, क्षमा दानधर्म व आत्मशुद्धीला महत्व दिले गेले आहे. ईद उल फित्र या पवित्र सणानिमित्त मी राज्यातील जनतेला, विशेषतः मुस्लिम बंधु , भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो. हा सण सर्वांच्या जीवनात आनंद, शांती व समृध्दी घेऊन येवो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.