बंद

    इरफान खान यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

    प्रकाशित तारीख: April 29, 2020

    29.04.2020 :- इरफान खान यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रसिद्ध अभिनेते इरफान खान यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

    इरफान खान यांचे निधन धक्कादायक आहे. इरफान खान हे सामाजिक जाण असणारे प्रतिभावंत कलाकार होते. आपल्या सशक्त अष्टपैलू अभिनयामुळे त्यांनी अनेक चित्रपट तसेच मालिकांमधील भूमिका संस्मरणीय केल्या. त्यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपट सृष्टीचे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनाचे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना देवो, ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.