बंद

    आनंद शंकर पंड्या यांच्या पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

    प्रकाशित तारीख: October 12, 2018

    विश्व हिंदू परिषदेचे माजी उपाध्यक्ष आनंद शंकर पंड्या लिखित ‘इंडियाज व्हिजन फॉर ग्लोबल प्रोस्पेरीटी’ या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवारी (दिनांक ११) राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते राजभवन, मुंबई येथे पार पडले.

    यावेळी केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण व पंचायती राज राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला, आमदार राजपुरोहीत, आमदार आशीश शेलार, लेखक आनंद शंकर पंड्या व इतर मान्यवर उपस्थित होते.

    आनंद शंकर पंड्या हे देशसेवा तसेच भारतीय संस्कृतीच्या वैभव संवर्धनासाठी झटणारे कर्मयोगी आहेत असे गौरवोद्गार राज्यपालांनी यावेळी काढले. युवकांना आधुनिक शिक्षण व कौशल्य प्रशिक्षण देण्यासोबतच त्यांच्यामध्ये भारतीय संस्कृतीबद्दल अभिमान निर्माण केल्यास भारत एक महान राष्ट्र होईल असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला. तर, आनंद शंकर पंड्या हे ऋषितुल्य व्यक्तित्व असून त्यांचे पुस्तक नव्या पिढीला प्रेरणा देणारे आहे, असे उद्गार केंद्रीय राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी काढले.