बंद

    आंबेनळी घाट बस दुर्घटनेबद्दल राज्यपालांना तीव्र दुःख

    प्रकाशित तारीख: July 28, 2018

    महाबळेश्वर – पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात शनिवारी (दिनांक २८) बस कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल राज्यपाल तथा कुलपती चे. विद्यासागर राव यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

    पोलादपूर जवळ झालेल्या आजच्या दुर्दैवी अपघातामधे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील अनेक अधिकारी व कर्मचारी तसेच बसचे चालक यांना प्राण गमवावे लागल्याचे समजून आपणास धक्का बसला व तीव्र दुःख झाले. सर्व मृतांच्या कुटुंबीयांना व आप्तजनांना मी आपल्या शोकसंवेदना कळवीत आहे, असे राज्यपालांनी आपल्या शोक संदेशात संदेशात म्हटले आहे.