बंद

    अमिताभ बच्चन यांचे राज्यपालांकडून अभिनंदन

    प्रकाशित तारीख: September 24, 2019

    महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी अमिताभ बच्चन यांचे दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन केले आहे.

    चित्रपट सृष्टीतील महानायक श्री अमिताभ बच्चन यांना अत्यंत प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार पुरस्कार जाहीर झाल्याचे समजून अतिशय आनंद वाटला. अभूतपूर्व लोकप्रियता लाभलेल्या अमिताभ बच्चन यांनी गेली चार दशके देशातील तसेच जगभरातील सिने रसिकांचे मनोरंजन केले आहे. अनेक सामाजिक मोहिमांना त्यांनी आपला बुलंद आवाज दिला आहे. त्यांची कार्यप्रती निष्ठा व उत्कटता पूर्वीइतकीच कायम आहे. महाराष्ट्र ही बच्चन यांची कर्मभूमी राहिली आहे. त्यामुळे या पुरस्काराचा राज्यातील लोकांना विशेष आनंद झाला आहे. राज्यातील जनतेतर्फे तसेच आपल्या स्वतःच्या वतीने श्री बच्चन यांचे या पुरस्काराबद्दल हार्दिक अभिनंदन करतो व यापुढेही त्यांना लौकिक व गौरव प्राप्त होवो, अशा शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.