Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > इतिहास

इतिहास [परत जा]

राज भवन, मुंबई

प्रस्तावना

Ariel View of The Raj Bhavan, Mumbai मुंबई राजभवन हे महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान आहे. मुंबई शहरातील ती एक अतिशय सुंदर वास्तू आहे. राजभवन अंदाजे 50 एकर जमिनीवर वसलेले आहे व त्याच्या तीनही बाजूंना समुद्र आहे. मलबार हिल येथील राजभवन संकुल हे मैलभर लांब असलेली दाट वने, वाळुचे समुद्र किनारे आणि अनेक प्रकारच्या टवटवीत हिरवळीने व्यापले आहे. मुंबई राजभवनाबाबत सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ते दिड शतकांपासून इतिहासाचे ते साक्षीदार आहे.
    मुंबई राजभवन येथे सुंदर गालिचे, चित्रे, अत्युत्कृष्ट कोरीव काम केलेले दरवाजे व शोभिवंत फ्रेंच शैलीच्या खुर्च्या व सुंदर प्रतिमा असलेले सोफे यांचा मौल्यवान संग्रह आहे.
    राजभवनाला भेट देणाऱ्या अभ्यागतांना या इमारतींचा इतिहास व येथे ठेवलेल्या काही वस्तूंबाबत नेहमीच उत्सुकता असते. हे दालन कला व इतिहासावर प्रेम करणाऱ्यांसाठी मौल्यवान असेल.

काळाचे चढउतार

The Tides of Time          कड्यांनी संरक्षित, समुद्राने वेढलेले असे प्राचीन मंदिर राजभवन येथे आहे. समुद्रकिनाऱ्याच्या वळणाच्या पलिकडे त्या मूर्त्या इतिहासाच्या अनंत क्षितिजाकडे टक लावून पाहतात. त्यांनी वाळूवर लिहिलेला धर्मग्रंथाच्या कालावधीतील चढउतार पाहिलेला आहे.
    या बेटांवरील आद्यतम शक्ती असलेल्या या मूर्त्यांची, मुंबईचे पूर्वीचे रहिवाशी असलेले कोळी (मासेमारी करणारे लोक) पूजा करीत असत. नंतरच्या शतकांच्या कालप्रवाहात या मंदिराने आक्रमणकर्त्यांना किनारे लुटून नेताना पाहिले. पोर्तुगीज आले, त्यांनी या प्रदेशाची साफसफाई केली व नवीन पीठे सत्ता केंद्रे स्थापन केली. इंग्रज, व्यापारवृद्धीच्या लालसेने आले. पोर्तुगीजांनी मुंबईतून माघार घेतली व ते दक्षिणेत गेले.
    इंग्रज देशी भूमीत आपल्या विदेशी शासनाची पाळेमुळे रोवून येथेच राहिले. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बॉम्बे कॅसलपासून त्यांनी त्यांची राजवट सुरू केली. राजकीय प्रवाहातील स्थलांतरणाच्या ओघात गव्हर्नमेंट हाऊस मलबार पाँईट येथे हलविण्यात आले जेथे लाटांचा मंदिराच्या वाळूला सतत अंखड मारा बसत होता.
    दरम्यानच्या काळात स्वातंत्र्यासाठी संपूर्ण देशभर उठाव झाला. 15 ऑगस्ट 1947 रोजी मध्यरात्री शासकीय आवास येथे स्वतंत्र राष्ट्राची विजयी घोषणा दुमदुमली.
    नवीन भारताची निर्मिती झाली. गव्हर्नमेंट हाऊसला `राजभवन` असे नवीन नाव देण्यात आले. प्राचीन देवता व आधुनिक लोकशाहीच्या शिरोदन्तीत भारतीय तिरंगा अभिमानाने फडकविण्यात आला.
    ब्रिटिश आरमार क्षितिजापलीकडे जात होते व ब्रिटिश साम्राज्यावरील सूर्य अस्ताला जाताना या देवता पाहात होत्या. भारतीय राज्यपालांनी कोळी लोकांना त्यांच्या धार्मिक विधींचे पुनरूज्जीवन करण्यासाठी निमंत्रित केले.
    देवांचा धावा करण्यासाठी कोळी समाज फुले व धूप या धार्मिक वस्तूंसह परत आले. त्यांनी दुधाने व तुपाने देवतांना शुद्ध केले. पुज्यभावाने, ते शांत देवतांपुढे नतमस्तक झाले. समुद्रचे अपत्य असलेल्या मुंबईचे दैव अखंड अबाधित राहो, अशी त्यांनी प्रार्थना केली.

बदलते वारे

बदलते वारे पोर्तुगीजांनी (1534 मध्ये) "बॉम बेम" च्या समुद्रात नांगर टाकला. ते, 1626 मध्ये अँग्लो डच सैन्यात व्यापारी वारे वाहत होते तोपर्यंत या बेटावर राहिले. इंग्लड व हॉलंडचे सैन्य पोर्तुगीजांवर नियत्रंण मिळवू शकले नाही. त्यांनी मसाल्याच्या पदार्थांचा व्यापार  करण्याच्या लालसेने बेट सोडले. हे ठिकाण जिंकण्यासाठी युद्ध न करण्याचे इंग्रजांनी ठरविले. कारस्थान रचले गेले व विवाहविषयक राजकारण मसाल्याच्या संपत्तीशी बांधल्या गेले.
    1661 मध्ये, शाही लग्नाची घोषणा करण्यात आली की, राजा चार्ल्स दुसरा पोर्तुगालच्या राजाची बहीण कॅथेरीन ब्रॅगान्झा हिच्याबरोबर विवाहबद्ध होईल. यामधील अट अशी होती की, नवरीने येताना "बॉम बेम" हे बेट तिच्याबरोबर आंदण म्हणून आणावे.
    इंग्लिश गव्हर्नर, सर अब्राहम शीपमन, राजाला बेट हस्तांतरित करण्यासाठी, "बॉम बेम" बेटाच्या प्रवासाला बोटीने निघाला, त्यावेळच्या पोर्तुगीज गव्हर्नरने 1665 पर्यंत या हस्तांतरणाला जाणीवपूर्वक विलंब केला. आपले कर्तव्य पार पाडण्याआधीच शीपमन, कर्तव्यावर असताना मरण पावला. हे काम हम्फ्री कुककडे सोपविण्यात आले.
    1665 मध्ये, कुकने हातात माती व दगड घेऊन "बॉम्बै" चा समारंभपूर्वक ताबा घेतला. राजाला मौल्यवान रत्न भेट देऊन, `मनोर हाऊस` मध्ये ताब्याच्या विलेखावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

बॉम्बे कॅसल

Bombay Castle इंग्रजांनी, मनोर हाऊस येथे स्वत:ला प्रस्थापित केले व त्याला "दि बॉम्बे कॅसल" असे नवीन सार्वभौम नाव बहाल केले. हे पहिले `गव्हर्नमेंट हाऊस` फोर्टच्या मध्यवर्ती भागात, टाऊन हॉलच्या मागे आणि टांकसाळ (मिंट) व ओल्ड कस्टम हाऊसच्या मध्ये वसलेले होते.
    बॉम्बे कॅसलकडे एवढे आधिपत्य होते की ते, बंदराला लष्करी डावपेचाप्रमाणे घेराव घालू शकत होते. त्याला दोन उपसागर होते व ते एक नगर होते. सेकंड लेफ्टनंटच्या शब्दात, बॉम्बे कॅसल हा आपण बनविलेला भारतातील सर्वात मजबूत बालेकिल्ला होता.
    इतिहासकार जेम्स डग्लस यांनी बॉम्बे कॅसलचा शक्तिशाली प्रभाव असल्याचे जाहीर केले. उंच दारामधून तुम्ही जाताना, दोन आकृत्या तुमच्याकडे बघतात. स्वत: महान जगत्प्रवासी असलेले उंच पोतुगीज  सैनिक समुद्रमार्गे व जमिनीद्वारे वसाहतीच्या साम्राज्यात वाढ करणारे सूचक ध्येयचिन्ह आहे.
    चार्ल्स दुसरा या राजाला निधीची सतत आवश्यकता भासत होती. त्याने 1668 मध्ये कर्जाच्या बदल्यात व वार्षिक दहा पौंड इतक्या भाडेतत्त्वावर हे बेट ईस्ट इंडिया कंपनीला दिले. सर जॉर्ज ऑक्सीनडेन हे ईस्ट इंडिया कंपनीद्वारे नियुक्त केलेले पहिले राज्यपाल (गव्हर्नर) होते.
    1686 मध्ये, ईस्ट इंडिया कंपनीने आपले मुख्यालय सुरतेहून बॉम्बेला हलविले. 1710 मध्ये, कॅसलमध्ये बळकट शस्त्रागार, सैनिकांसाठी घरे व वीस महिन्यांसाठी हजार लोकांकरिता शुद्ध पाण्याचा पुरवठा होईल यासाठी टाक्यांची व्यवस्था करण्यात आली होती.
    नंतर, तटबंदीच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. हे काम सुरू असतानाच अन्य ठिकाणी स्थलांतरण करण्यात आले. गव्हर्नरांनी तटबंदीच्या आत राहणे धोरणात्मक दृष्ट्या अयोग्य असल्याचे समजण्यात आले. कारण त्यांना भेटावयास येणाऱ्या सर्वांना तटरक्षक सेनेची शक्ती व सिध्दाता याची माहिती मिळाली असती. नवीन निवासाचा शोध घेण्यास सुरुवात झाली

न्यू हाऊस

French Plan of Bombay Island, 1767श्री.जॉन स्पेन्सर यांचे अपोलो मार्गावरील घर, 1757 मध्ये खरेदी करण्यात आले होते. ते गव्हर्नरांचे नवीन निवासस्थान झाले असते. त्याला व त्यानंतर असे समर्पक नाव देण्यात आले होते.
    गव्हर्नर याठिकाणी अधिक काळ राहीले नाहीत. मुंबईचा विस्तार होण्यास सुरुवात झाली होती व शहराच्या मध्यवर्ती भागात गर्दी वाढायला लागली होती. गव्हर्नरांनी अधूनमधून उष्ण हवामान असलेले परळ येथील निवासस्थान पसंत केले होते.

सॅन्स पेरील

Government House, Parel    जुन्या वैजनाथ मंदिराच्या भग्नावशेषांवर परळ येथे पूर्वी जेथे जेझ्युइट मठ होता तेथे भव्य भवन बांधण्यात आले. कर्स्टेन नेबूर या प्रवाशाने परळ येथील बंगल्याला, संपूर्ण भारतात त्याच्याशी तुलना करू शकणारे काहीही नाही म्हणून "सॅन्स पेरील" (अद्वितीय) म्हणावे असे सुचविले होते.
    श्री.डब्ल्यू.हॉर्नबी (1771-1784) हे परळ येथील निवासस्थानी राहण्यास जाणारे पहिले गव्हर्नर होते. मंजुळ व मधूर आवाजानी दरबार हॉल व्यापूर टाकला. या विशेष आनंदाच्या सांयकाळी, बॅक्वेट हॉल मधील झुंबराच्या (शॅडेलिअरच्या) खाली चायना व बिलोरी (क्रिस्टल) काचेची भांडी चकाकत असत. 1804 मध्ये, बॉम्बे लिटररी सोसायटी सुरू करण्याच्या प्रित्यर्थ गव्हर्नर जोनाथन डन्कन यांनी आयोजित केलेल्या मेजवानीस आंमत्रितांनी आपापले ग्लास उंचावले होते.
    दरम्यानच्या काळात परळमधील औद्योगिकीकरणामुळे हवा प्रदूषित होण्यास सुरुवात झाली होती. लोकसंख्येत वाढ झाली होती. प्रदूषकांमुळे वातावरण दूषित झाले होते. वायूप्रदूषण व दूषित पाण्यामुळे रोगराई पसरायला लागली होती.
    गव्हर्नर रिचर्ड टेम्पल यांनी आपले निवासस्थान मलबार पाँईट येथे हलविले. 1883 मध्ये, गव्हर्नरांची पत्नी लेडी फर्ग्युसन, यांचा परळ हाऊसमध्ये कॉलऱ्यामुळे मृत्यु झाला. त्यांच्या मृत्युनंतर गव्हर्नमेंट हाऊस अधिकृतपणे मलबार पाँईट येथे हलविण्यात आले.
    परळ येथील निवासस्थान प्लेग रुग्णालयात रूपातंरित करण्यात आले. जेथे 1897-98 मध्ये मुंबईत आलेल्या प्लेगच्या साथीत शेकडो लोकांवर उपचार करण्यात आले होते.
    डॉ.वाल्डेमर हाफकीन येथे आले आणि त्यांनी प्लेग व कॉलऱ्याची लस शोधून काढली. 1925पासून, हे गव्हर्नमेंट हाऊस ज्यांनी या जागेचे विज्ञानाच्या बालेकिल्ल्यात रूपांतर केले त्या डॉ.हाफकीन यांच्या स्मरणार्थ `हाफकीन` संस्था म्हणून ओळखले जाऊ लागले.

मलबार पॉईंट

Grindlay's drawing - View from Malabar Hill    जुन्या वैजनाथ मंदिराच्या भग्नावशेषांवर परळ येथे पूर्वी जेथे जेझ्युइट मठ होता तेथे भव्य भवन बांधण्यात आले. कर्स्टेन नेबूर या प्रवाशाने परळ येथील बंगल्याला, संपूर्ण भारतात त्याच्याशी तुलना करू शकणारे काहीही नाही म्हणून "सॅन्स पेरील" (अद्वितीय) म्हणावे असे सुचविले होते.
    श्री.डब्ल्यू.हॉर्नबी (1771-1784) हे परळ येथील निवासस्थानी राहण्यास जाणारे पहिले गव्हर्नर होते. मंजुळ व मधूर आवाजानी दरबार हॉल व्यापूर टाकला. या विशेष आनंदाच्या सांयकाळी, बॅक्वेट हॉल मधील झुंबराच्या (शॅडेलिअरच्या) खाली चायना व बिलोरी (क्रिस्टल) काचेची भांडी चकाकत असत. 1804 मध्ये, बॉम्बे लिटररी सोसायटी सुरू करण्याच्या प्रित्यर्थ गव्हर्नर जोनाथन डन्कन यांनी आयोजित केलेल्या मेजवानीस आंमत्रितांनी आपापले ग्लास उंचावले होते.
    दरम्यानच्या काळात परळमधील औद्योगिकीकरणामुळे हवा प्रदूषित होण्यास सुरुवात झाली होती. लोकसंख्येत वाढ झाली होती. प्रदूषकांमुळे वातावरण दूषित झाले होते. वायूप्रदूषण व दूषित पाण्यामुळे रोगराई पसरायला लागली होती.
    गव्हर्नर रिचर्ड टेम्पल यांनी आपले निवासस्थान मलबार पाँईट येथे हलविले. 1883 मध्ये, गव्हर्नरांची पत्नी लेडी फर्ग्युसन, यांचा परळ हाऊसमध्ये कॉलऱ्यामुळे मृत्यु झाला. त्यांच्या मृत्युनंतर गव्हर्नमेंट हाऊस अधिकृतपणे मलबार पाँईट येथे हलविण्यात आले.
    परळ येथील निवासस्थान प्लेग रुग्णालयात रूपातंरित करण्यात आले. जेथे 1897-98 मध्ये मुंबईत आलेल्या प्लेगच्या साथीत शेकडो लोकांवर उपचार करण्यात आले होते.
    डॉ.वाल्डेमर हाफकीन येथे आले आणि त्यांनी प्लेग व कॉलऱ्याची लस शोधून काढली. 1925पासून, हे गव्हर्नमेंट हाऊस ज्यांनी या जागेचे विज्ञानाच्या बालेकिल्ल्यात रूपांतर केले त्या डॉ.हाफकीन यांच्या स्मरणार्थ `हाफकीन` संस्था म्हणून ओळखले जाऊ लागले.

राजभवन

राजभवन"प्राइसेस मेमारियल" मध्ये अशी नोंद आहे की, मलबार पॉईंट हे गव्हर्नर मेडोस (1788-1790) यांचे अधूनमधून रहायचे ठिकाण होते. सर ईवान नेपियन (1812-1819) याठिकाणी एका लहान खोलीत राहात होते.
    1880 मध्ये, सर रिचर्ड टेम्पल यांनी, परेल येथून निवासस्थान रीतसर हलविण्यास प्रारंभ केला होता. पूर्वीचे निवासस्थान व कार्यालय हे ‘´Ö¸üß®Ö ¾Æüß»ÖÖ’  म्हणून ओळखण्यात येत होते. या सुंदर जागेमधून, समुद्रकिनारा व वृक्ष यांची किनार असलेल्या 49 एकरांच्या जागेवर, राजभवन विकसित करण्यात आले.

जल भूषण

View of Jal Bhushanगव्हर्नर मॉन्टस्टुअर्ट एलफिन्स्टन जेथे राहीले होते त्याच टुमदार बंगलीच्या पायावर जल भूषण उभे आहे. हेबर यांनी याचे वर्णन, समुद्राच्या पाण्यानी धुतली जाणारी खडकाळ व वृक्षाच्छादित भूभागावरील टुमदार बंगली असे केले आहे. लॉर्ड एलफिन्स्टन यांनी बांधलेला नागमोडी वळणाचा रस्ता हुकूमत असणारा नगर दुर्ग, म्हणजेच राज्यपालांचे निवासस्थान असणाऱ्या `जल भूषण` कडे जातो. माँटस्टुअर्ट एलफिन्स्टन यांनी आयात केलेले फ्रेंच फर्निचर राज्यपालांच्या भव्य कार्यालयात ठेवले आहे. कलाकारांनी दुर्मिळ कलाकुसर असलेले अतिशय सुंदर लाकडीकाम, गुंतागुंतीचे चित्रकाम असलेल्या तसबिरी आणि लाकडावर केलेले ऐतिहासिक प्रसंगाचे चित्रण यांनी जल भूषण संपन्न केले आहे. कुंचल्याच्या कुशल फटकाऱ्याने त्यांनी लेसचा नाजुकपणा आणि मोत्यांचे तेज जिवंत केले आहे. वैभवशाली निवासस्थानात व कार्यालयात, भारतीय कलेच्या कलाकारांनी देखील आपले मानाचे स्थान मिळवले आहे. भारतीय श्रेष्ठ कलाकारांनी रेखाटलेली चित्रेही जलभूषणमध्ये आहेत.

जल चिंतन

Jal Chintan - A view over the edgeसमुद्राच्या बाजूला असलेल्या उंच कड्यावर असून त्याचे ँ जोते कड्यामध्ये घट्ट बसले आहे. एके काळी पॉईंट बंगलो या नावाने ओळखले जाणारे जल चिंतन या पायावर उभे आहे. हे राज भवनला भेट देणाऱ्या भारताच्या पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान आहे. अनधिकृतपणे ते पंडितजींचे (पंडित जवाहरलाल नेहरू यांचे) आवडीचे निवासस्थान होते. पंडितजी व अन्य पंतप्रधान हे अंधुक समुद्रातील अंधुक प्रकाशाकडे पाहत चिंतन-मनन करीत जल चिंतनच्या सज्जावर (बाल्कनी) उभे राहिले असतील. अंधाराला छेदणारा एकमेव प्रकाश किरण  प्राँगच्या लाईटहाऊस मधून येत असे त्याचे प्रकाशकिरण 35 मैलांपर्यंत पसरत असत. नाविकांसाठी, या दीपस्तंभाचे किरण म्हणजे त्यांचे मुंबईच्या उपसागरात आगमन झाल्याचे निदर्शक होते.
    समुद्राच्या काळ्या कातळावर फेसाळणाऱ्या लाटा आपटताना तुम्ही अजुनही या सज्जामधून पाहू शकता कडक व खडबडीत कडा, उसळणाऱ्या समुद्राशी लढताना बघून तासनतास कसे निघून जातात, ते कळतही नाही.

जल लक्षण

Portrait of Amrut Rao Saheb Dufflayहे निवासस्थान भारताच्या राष्ट्रपतींच्या भेटीसाठी राखून ठेवण्यात आले आहे. जल लक्षण येथे एक व्यक्ती कायमस्वरूपी ठेवण्यात आलेली आहे. येथे मराठा सरदारांच्या तसबिरींचा संग्रह आहे. असे म्हणतात की, सर बॅटल फ्रेरे यांनी 1857 च्या बंडांनंतर, ही चित्रांची मालिका चित्रित करण्यासाठी थीओडोर जेन्सेन यांची नेमणूक केली होती. आपल्या कुंचल्याने व तैलरंगाने, जेन्सेनने सरदारांचा असलेला बाणेदारपणा व डौल प्रत्यक्षात उतरवला आहे.
    ही चित्रे गव्हर्मेंट हाऊस येथे आणण्यात आली होती. या कलाकारांना राजकीय योग्यतेने प्रोत्साहनही देण्यात आले होते. या आदरांजलीमुळे नेत्यांचा विरोध मावळेल व ब्रिटिश राज्य स्वीकारण्यास त्यांने मन वळविता येईल अशी फ्रेरेला आशा वाटत होती.
    जल लक्षणला राष्ट्रपती भेटीची प्रतिक्षा असते. राष्ट्रपती, त्यांच्या प्रतिष्ठेला साजेशा अशा वातावरणामध्ये, या भव्य आदरातिथ्य कक्षांना भेटी देण्यासाठी पाहुण्यांना निमंत्रित करतात. पाहुणे  येतात व सोन्याचा मुलामा दिलेल्या कोरीव फर्निचरवर बसून, राष्ट्रपतींबरोबर सहभागी होतात.
    राष्ट्रपतींच्या दालनातदेखील मुघलांच्या शैलीतील लहान वस्तूंचा अमुल्य संग्रह आहे.

जल विहार

Interior of Jal Viharमेजवानी दिवाणखाना (बँक्वीट हॉल) आता जलविहार या नावाने ओळखला जातो. कवी मनाच्या शील्पकारागीरांनी बनविलेल्या कोरीव पडद्यांमुळे भोजनकक्षाची जागा स्वागत कक्षापासून वेगळी झाली आहे.
     दोन्ही दिवाणखान्यांच्या घुमटाकार छतांवर भारताच्या अशोकास्तंभावरील सिंहाची नक्षी काढली आहे. जमिनीवर अत्यंत किंमती असे पर्शिअन गालिचे पसरलेले असून या गालिच्यावर प्राचीन भरतकामाच्या अत्यंत सुंदर शोभाकृती आहेत, ज्या मुघल काळाची आवठवण करून देतात.
    राज्यपाल, प्रतिष्ठित व्यक्ती व भेट देणारे राज्याचे प्रमुख यांच्यासाठी येथे राज्यपाल मेजवान्या आयोजित करतात. चांगल्या चांगल्या प्रसंगी जेव्हा अनेकस्तर असलेल्या झुंबरांचा प्रकाश चांदीच्या तबकांमधून परावर्तित होतो तेव्हा पाहुण्यांना जल विहारमध्य जेवणाचा एक मनोवेधक अनुभव मिळतो.

जल सभागृह

Facade of Jal Sabhagraha    जलसभागृह हे, राजभवनाचा शांत व प्रसन्नचित्त असा दरबार हॉल आहे. क्षितिज समांतर असलेल्या फ्रेंच पद्धतीच्या खिडक्यांमधून आत येणारी उगवत्या सुर्याची किरणे येथे चकाकत असतात.
    शपथविधीसारखे महत्त्वाचे कार्यक्रम या जलसभागृहामध्ये होतात. या भव्य सभागृहाचा वापर राज्यपाल साहित्यिक व कलाकार यांचा गौरव करण्यासाठीदेखील करतात.

प्राप्त झालेला वारसा

Raj Bhavan at Nightराजभवनाचा परिसर समुद्रकिनाऱ्यापासून जमिनीपर्यंतच्या उंचसखल जागेवर पसरलेला आहे. एकोणपन्नास एकरावर घुमटाकार जंगल कडा, समुद्र व वाळू आहे. राजभवन हे इतिहासाची अभिव्यक्ती असून महाराष्ट्राचा व भारताचा अभिमानास्पद वारसा आहे.

राज भवन, पुणे

Raj Bhavan Pune

The Dhapooree House - Pune


Today Ganeshkhind might mean the Pune University to most. But half a century ago it suggested the Government House, the monsoon resort of the Governor of Bombay. Yet the name still evokes the memories of that fateful night of 22nd June 1897. It was on this day that Walter Charles Rand, Special Officer for Plague in Pune, who invited the wrath of Pune residents for his atrocities, was assaulted by the Chapheker brothers while he was returning from the Government house after attending the Golden Jubilee celebrations or the Queens coronation. The rest is history.

But before Ganeshkhind became the official residence of the Governor, there was another house, at Dhapooree, where the story really began. It was here that the political diplomacy of the British, relating to the Southern Maratha Country, took shape. Today its tangible and intangible traces have completely faded out of memory.

Pune has the distinction of being the monsoon residence of the Governor of Bombay, now Maharashtra, for almost a hundred and eighty years, through the period of stay has now been reduced to a symbolic month. Even so the Governor today attends the Independence Day celebrations on 15th August at Pune just as he presides over the

Republic day celebrations on 26th January at Mumbai, Shri Sri Prakasa (1956-1962) was, perhaps, the last Governor who kept the schedule of a stay of four months, away from Mumbai, residing at Mahabaleshwar in May and at Pune from June to August.

Commenting on this practice Maclean, as early as 1875, remarked,

Even the Bombay Government stays (at Bombay) sometime, from the and of November to the end of the March, though in most years it takes itself off to Matheran or Mahabaleshwar at the end of February, moves to Poona at the end of May and does not till November come clown.

Pune, by then, had indeed become the second capital of Western India. It was the HQ of the Army and of several government departments. Maclean even thought

it can boast of the finest Governors palace in India, a Council Hall big enough for a Parliament of Western India instead of a dozen legislators who assembled in it three or four times a year.

The new house at Ganeshkhind that was completed and occupied in 1871 overwhelmed Maclean.

While the residency at Mahabaleshwar was clearly for physical comfort, to avoid the hot and sultry summer of Bombay, political expediency was undoubtedly the motivation for Elphinstones choice of Pune for establishing a residency. It also came with a premium, as the climate of Pune during the monsoon was as pleasant as the English summer. Despite the inconveniences of travel and often inclement weather, Elphinstone seems to have enjoyed staying away from Mumbai and Parel for he built for himself a cottage at Malabar Point, a bungalow at Khandala and often stayed at Ghorabunder with friends in a small but handsome building, a very cool and convenient house for this climate and commanding a magnificent view.

राज भवन, नागपूर

Raj Bhavan Nagpur In its 110 years of existence, the Nagpur Raj Bhavan has acquired a distinct chronology:

• 1891 House of the Chief Commissioner, Central Province
• 1903 House of the Chief Commissioner, C P & Berar
• 1920 Govt. House of the Governor of the Central Provinces
• 1947 Govt. House of the Governor of Madhya Pradesh
• 1956 Govt. House of the Governor of Bombay
• 1960 Govt. House of the Governor of Maharashtra
• 1988 Raj Bhavan in the second capital of Maharashtra

राज भवन, महाबळेश्वर

Raj Bhavan Mahabaleshwar Mahabaleshwar and Pune have almost concurently served as the Summer houses of the Governor of Bombay. The Governors House at Mahabaleshwar known as the Terraces and rechristened as Giri Darshan is a relatively small building, but nestled in the midst of forests, it is an ideal set up to enjoy the beauty of the Sahyadri Hills. The Governor uses this building for a few weeks in summer and undertakes visits from here to the neighbouring places to monitor the progress of development projects and attend public functions.

The Terraces was purchased in 1884 and added to the Government house properties in 1886. In 1932, the earlier residence of the Governor, the Bella Vista was discontinued in favour of the Terraces. It, however, seems that both houses were intermittently used, depending on the choice of every individual Governor. That is the reason why the Terraces had to undergo major renovation when the present Governor chose to reside at the Terraces.

An urge to escape the sultry heal of Bombay combined with the natural love of the country side was inescapable temptation to go to Mahabillisir (Mahabaleshwar) at least for man of Elphinstones taste.

Charles Malet, the English Resident at the court of Sawai Madhavrao Peshwe, may have been the first European to set foot on the Mahabaleshwar hill but its importance as a health resort was noticed by Major Lodwick in the Bombay Courier of 1st May 1824. LodwicK concluded with a positive assertion:

There is abundant room for several parties who may be near or distance each other and Mahabillysir is capable of becoming form its centrical situation the resource of all who are in search of health, of pleasure, or of retirement, without much fear of disappointment and with power of returning home immediately, should duty call or expectation not be gratified."

Lodwick did not forget to reassure:

Neither tiger nor thieves are to be feared; we neither saw nor heard of any during our stay.

We will leave it to the occupants to say how true was Lodwick.

Mahabaleshwar is located in the Sahyadri rang also known as the Western Ghats, at an altitude of 4718 ft and takes its name from an ancient Shiva temple at old Mahabaleshwar connoting "Maha + Bala + Ishwara" i.e. "God of Great strength".

Its other identity lies in its being the origin of a major river in the Deccan, the Krishna which runs through three states, Maharashtra, Andhra and Karnataka and today known more for the dispute over the distribution of its waters. In the vicinity of Mahabaleshwar is the fort of Pratapgadh, famous in Maratha history for the meeting of Chhatrapati Shivaji and Afzalkhan, a General of the Bijapur court, and as the seat of the goddess Tulja Bhavani.

परत वरच्या बाजूला