Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

02.10.2019

अर्कांसास गव्हर्नर - राज्यपाल भेट

अर्कांसास गव्हर्नर - राज्यपाल भेट

कापूस उत्पादन क्षेत्रात राज्याला सहकार्य करण्यास अर्कांसास उत्सुक

अमेरिकेच्या दक्षिणेला असलेल्या अर्कांसास राज्याचे गव्हर्नर एसा हचिंसन यांनी आज  राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेतली.

अर्कांसास हे भात शेतीमध्ये अग्रेसर असून कापूस उत्पादनात देखिल आघाडीवर असल्याचे सांगून कापूस उत्पादन क्षेत्रात  महाराष्ट्राला सहकार्य करण्यास अर्कांसास तयार असल्याचे, एसा हचिंसन यांनी सांगितले.

अर्कांसास येथे मुख्यालय असलेल्या वॉलमार्ट या बहुराष्ट्रीय कंपनीच्या भारतात २७ शाखा असून भारतातील वेलस्पन तसेच अनेक माहिती तंत्रज्ञान कंपन्या देखिल अर्कांसास राज्यात कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र व अर्कांसास मध्ये सहाकार्याचे पर्व सुरु झाल्यास त्यातून विकासाची अनेक दालने उघडतील, असा आशावाद राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केला.

अर्कांसास गव्हर्नर यांचे सोबत आलेल्या शिष्टमंडळात वेलस्पण कंपनीचे अर्कांसास येथील मुख्य  अधिकारी राजेश चोखाणी   उपस्थित होते.