Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रकाचे तपशील[परत जा]छापाprint

11.08.2019


बकरी ईद निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

 

महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी राज्यातील लोकांना बकरी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

 

बकरी ईद (ईद उल झुहा) हा पवित्र सण पूर्ण श्रद्धा व समर्पण भावनेचा संदेश देतो. हा  सण साजरा करताना दानधर्म तसेच उपेक्षित वर्गाच्या कल्याणाचा उदात्त विचार केलेला आहे. बकरी ईदच्या सणानिमित्त मी राज्यातील लोकांना विशेषतः मुस्लीम बंधू - भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.