Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रकाचे तपशील[परत जा]छापाprint

25.07.2019


राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते पोलीस शौर्य पदक, राष्ट्रपती पदक प्रदान

25 जुलै, 2019

 

राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते

पोलीस शौर्य पदक, राष्ट्रपती पदक प्रदान

मुंबई, दि. 25 : राष्ट्रपतींचे पोलीस शौर्य पदक, राष्ट्रपती पोलीस पदक आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठीचे पोलीस पदक मिळालेल्या राज्य पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांना राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते ही पदके प्रदान करण्यात आली. 

राज्य पोलीस मुख्यालयात झालेल्या या पोलीस अलंकरण समारंभास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल आदी उपस्थित होते.

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद विरोधी कारवाई केल्याबद्दल घोषित राष्ट्रपती पोलीस शौर्य पदकांचे तसेच उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक व पोलीस पदके राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी घोषित झाली होती. या पदकांचे वितरण राज्यपाल श्री. राव यांच्या हस्ते व मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

            गडचिरोली मधील हिक्केर जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहिद झालेल्या दोगे डोलू आत्राम व स्वरुप अशोक अमृतकर यांना मरणोत्तर शौर्यपदक जाहीर झाले होते. या शहिदांच्या कुटुंबियांना पदके प्रदान करण्यात आली.

०००