Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

04.06.2019

ईद उल फित्रनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा


 

राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी ईद उल फित्र (रमजान ईद) निमित्त राज्यातील  नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 

रमजानचा पवित्र महिना उपवास, प्रार्थना, दानधर्म तसेच परोपकाराचे महत्व अधोरेखित करतो. ईद उल फित्र (रमजान ईद) सणानिमित्त मी राज्यातील नागरिकांना, विशेषतः मुस्लिम बंधु - भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतोहा सण सर्वांच्या जीवनात आनंद, शांती व समृध्दी घेऊन येवो, अशी याप्रसंगी मंगल कामना करतो,  असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.