Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

26.04.2019

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाची उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केली पाहणी

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाची

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केली पाहणी

 

मुंबई, दि. 26 : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाची पहाणी केली. यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव उपस्थित होते.

भारतीय चित्रपटांवर आधारित हे संग्रहालय उभारण्यात आले आहे. व्हिज्युअल्स, एक्सीबीट्स, ग्राफीक, मल्टीमीडिया,  इंटरॅक्टीव चा समावेश असलेल्या संग्रहालयाच्या माध्यमातून भारतीय चित्रपट सृष्टीचा गौरवशाली प्रवास मांडण्यात आला आहे.

चित्रपटसृष्टीच्या माध्यमातून सामाजिक विकास, शिक्षण आणि मनोरंजनासाठी मदत होत असते. त्यासाठी चित्रपट पाहिले पाहिजे. अतिशय सुंदर असे संग्रहालय उभारण्यात आले आहे. संग्रहालय पाहून खूप आनंद झाला या संग्रहालयाला सर्वांनी  भेट द्यावी, असे उपराष्ट्रपती श्री. नायडू यांनी यावेळी सांगितले.

महान्यूज