Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

15.04.2019

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त राज्यपालांचे चैत्यभूमी येथे अभिवादन

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी रविवारी (दिनांक १४) चैत्यभूमी येथे डॉ आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला व त्यांच्या स्मृतीला अभिवादन केले. यावेळी सामुदायिक त्रिशरण बुद्ध वंदना करण्यात आली.

 

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर व डॉ बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी स्मारक समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

 

त्यानंतर राज्यपालांनी मुंबई महानगरपालिकेतर्फे नजिकच लावण्यात आलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर सचित्र प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी पालिका आयुक्त अजोय मेहता व सहआयुक्त अश्विनी जोशी उपस्थित होते. राष्ट्रगीताने या भेटीची सांगता झाली.