Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

07.04.2019

मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदाची न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांनी घेतली शपथ

वृ.वि.917                                                                       फाल्गुन कृष्ण -13/1940( दु. 01.00 वा.)

                                                                                  दि. 7 एप्रिल 2019

 

 

मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदाची न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांनी

                                      घेतली शपथमुंबई 7 
: मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झालेल्या न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांना राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज पदाची शपथ दिली.

राजभवन येथे झालेल्या या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. शपथविधीनंतर राज्यपाल व मुख्‍यमंत्री यांनी न्यायमूर्ती श्री. नंदराजोग यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. राज्याचे मुख्य सचिव यू.पी.एस.मदान यांनी  न्यायमूर्ती नंदराजोग यांच्या नियुक्तीच्या अधिसूचनेचे वाचन केले.

या सोहळ्यास  मुंबई उपनगरचे पालकमंत्री तथा उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडेमहापौर विश्वनाथ महाडेश्वर, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश मोहित शहाराजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, राज्याचे लोकायुक्त एम.एल.तहलियानी, राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रियमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष चंद्रशेखर ओकमुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वेराज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी आदींसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या सोहळ्याचा प्रारंभ आणि समारोप राष्ट्रगीताने झाला.

न्यायमूर्ती श्री. नंदराजोग हे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून दिल्ली उच्च न्यायालयात कार्यरत होते. तसेच2017  मध्ये राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते.

 

०००००