Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

20.03.2019

होळीनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी राज्यातील जनतेला होळी व रंगपंचमीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

 

होळी चा सण हा संपूर्ण देशामध्ये उत्साहाने साजरा केला जातो. भिन्नतेने नटलेल्या भारतीय समाजामध्ये परस्पर प्रेम, बंधुभाव व सलोखा वाढविणारा हा सण आहे. या पवित्र सणानिमित्त मी राज्यातील सर्व नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.