Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

07.03.2019

कोकण कृषि विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ संजय सावंत यांची नियुक्ती


पूणे येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ संजय दिनानाथ सावंत यांची दापोली येथील डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यपाल तथा कुलपती चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी गुरुवारी (दिनांक ०७ मार्च) डॉ सावंत यांच्या नियुक्तीची घोषणा केली. डॉ सावंत यांची नियुक्ती पाच वर्षासाठी किंवा ते वयाची ६५ वर्षे पुर्ण करतील, यापैकी जो दिनांक अगोदर असेल, तोपर्यत  करण्यात आली आहे.  

डॉ तपस भटटाचार्य यांनी दिनांक 31 ऑगस्ट 2018 रोजी विदयापीठाच्या  कुलुगुरुपदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे  कुलगुरु डॉ के पी विश्वनाथ यांचे कडे विद्यापीठाच्या कुलगुरु पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.

डॉ संजय सावंत यांनी राहूरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठातून एम. एससी (कृषि) ही पदवी प्राप्त केल्यानंतर पंतनगर येथील गोविंद बल्लभ पंत कृषि विश्वविदयालयातून पीएच. डी. प्राप्त केली. त्यांना अध्यापन, संशोधन तसेच प्रशासन क्षेत्रात व्यापक अनुभव आहे.

 डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या  निवडीसाठी राज्यपालांनी मुंबई उच्च न्यायालयातील सेवानिवृत्त  मुख्य न्यायाधीश न्यायमुर्ती (डॉ ) मंजुला चेल्लूर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती.

भारतीय कृषिसंशोधन परिषदेचे महासंचालक  डॉ त्रिलोचन मोहापात्रा  आणि कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले हे समितीचे अन्य सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्यानतर राज्यपालांनी डॉ सावंत यांच्या नियुक्तीची घोषणा केली.