Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

29.01.2019

मुख्यमंत्री - सहयोगी योजनेत निवड झालेल्या प्रतिनिधींनी घेतली राज्यपालांची भेट

मुख्यमंत्री - सहयोगी योजनेअंतर्गत निवड होऊन राज्यांच्या विविध विकास प्रकल्पांवर कार्यरीत असलेल्या ४० युवा प्रतिनिधींनी आज (मंगळ. दि २९) राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची राज भवन, मुंबई येथे भेट घेतली.

 

राज्यातील पायाभूत  सुविधांचा विकास, बुलेट ट्रेन प्रकल्प, सायबर सुरक्षा, महिलांचे आर्थिक सक्षमीकारण, आदिवासी विकास, पंतप्रधान आवास योजना यांसह विविध विषयांवर प्रशासकीय विभाग तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे कार्य करीत असलेल्या मुख्यमंत्री - सहयोगी प्रतिनिधींनी आपले अनुभव राज्यपालांना संगितले.

 

मुख्यमंत्री फेलोशिप योजना गेल्या चार वर्षांपासून राबविली जात असून या योजनेत ५० स्नातक विद्यार्थी परीक्षेच्या माध्यमातून निवडले जातात तसेच त्यांना ११ महीने विविध विकास प्रकल्पांवर काम करण्याची संधी दिली जाते, अशी माहिती मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकारी प्रिया खान यांनी यावेळी दिली.