Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

22.01.2019

राज्यपालांच्या हस्ते होणार महालक्ष्मी सरस चे उदघाटन

महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील  महिला बचत गटांच्या सहभागातून आयोजित महालक्ष्मी सरस या प्रदर्शनाचे उदघाटन  राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते  बुधवार दिनांक 23 जानेवारी 2019 रोजी सकाळी ११ वाजता वांद्रा कुर्ला संकुल येथील एमएमआरडीए मैदान क्रमांक १, ४, ५ व ६ येथे होणार आहे. यावेळी राज्यपालांच्या हस्ते राजमाता जिजाऊ  स्वावलंबन पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

 

यंदा प्रदर्शनात राज्याच्या तसेच देशाच्या विविध भागातील बचतगट सहभागी झाले असून ५११ स्टॉलच्या माध्यमातून ते उत्पादनांची विक्री करणार आहेतयाशिवाय खाद्यपदार्थांचे ७० स्टॉल असून त्यातून मुंबईकरांना वेगवेगळ्या खाद्य संस्कृतींचा आस्वाद घेता येणार आहे. हे प्रदर्शन दिनांक २२ जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2019 पर्यंत खुले राहणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.

 

          उदघाटन समारोहाला विनोद तावडे, शिक्षण मंत्री,  पंकजा मुंडे, ग्राम विकास व महिला-  बालकल्याण मंत्री,  दादाजी भुसे, ग्रामविकास राज्यमंत्री तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.