Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

24.12.2018

नाताळ निमित्त राज्यपालांचे ‘मेरी क्रिसमस’

राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी राज्यातील जनतेला नाताळ निमित्त मेरी क्रिसमसशुभेच्छा दिल्या आहेत.

 

नाताळचा सण भगवान येशू ख्रिस्तांच्या कल्याणकारी जीवनाचे विशेषतः त्यांच्या करुणा व क्षमाशीलतेच्या संदेशाचे स्मरण देतो. येशू ख्रिस्तांनी शाश्वत सत्य व नितीमुल्यांचा पुरस्कार करताना सहन केलेल्या यातनांचे देखील यावेळी स्मरण होते. नाताळचा हा सण सर्वांच्या जीवनात आनंद, शांती व संपन्नता घेवून येवो. मी राज्यातील सर्व लोकांना नाताळनिमित्त मेरी क्रिसमसव नववर्षाच्या शुभेच्छा देतो, असे विद्यासागर राव यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.