Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

29.10.2018

केंद्रीय आदिवासी राज्यमंत्र्यानी घेतली राज्यपालांची भेट

केंद्रीय आदिवासी विकास राज्यमंत्री जसवंतसिंह भाभोर यांनी  राज्यपाल चे विद्यासागर राव यांची आज (दि २९) राज भवन मुंबई येथे भेट घेतली.

 

राज्यात वन हक्क कायदयाची अंमलबजावणी, राज्याच्या अनुसुचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना देण्यात येत असलेल्या थेट निधी वाटपाचे नियोजन तसेच आदिवासी विकासासंबधी इतर प्रश्नांवर यावेळी चर्चा झाली.

 

यावेळी राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, सहसचिव सुनिल पाटील तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.