Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

20.08.2018

राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यपालांनी दिली सद्भावना दिवस प्रतिज्ञा

दिवंगत पंतप्रधान  राजीव गांधी यांच्या चौऱ्याहत्तराव्या जयंतीनिमित्त राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज (दि. 20) राजभवनातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना सद्भावना दिवस प्रतिज्ञा दिली.

जातवंशधर्मप्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करण्याची,  तसेच सर्व प्रकारचे मतभेद हिंसाचाराचा अवलंब न करता संविधानिक मार्गानी सोडविण्याची प्रतिज्ञा राज्यपालांनी उपस्थितांना दिली. 

सुरुवातीला राज्यपालांनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेला फुले वाहून आपली आदरांजली वाहिली.  

यावेळी राज्यपालांचे सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उपसचिव रणजीत कुमार, परिवार प्रबंधक वसंत साळुंके तसेच राजभवन येथे कर्तव्य बजावत असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाचे जवान  व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.