Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

19.06.2018

राज्यपालांच्या विद्यापीठ आणि महाविद्यालयांना आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याच्या सूचना

राज्यपाल तथा कुलपती चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी आज (दि. १९ जून) राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना २१ जून रोजी विद्यापीठांमध्ये तसेच संलग्न महाविद्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याच्या सूचना केल्या आहेत.

 

विद्यापीठांनी योग दिवस साजरा करताना सर्वसामायिक योग प्रणाली (कॉमन योग प्रोटोकॉल) तसेच योग प्रार्थनेचा समावेश करावा आणि प्रतिष्ठित नागरिकांना निमंत्रित करावे. आंतरराष्ट्रीय योग दिवस केवळ एक दिवसाचे आयोजन न राहता ती वर्षभर चालणारी नियमित क्रिया व्हावी याकरिता विद्यापीठांनी कृती आराखडा तयार करावा, अशी देखील सूचना राज्यपालांनी केली आहे.

 

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विद्यापीठ / महाविद्यालयांनी घेतलेल्या कार्यक्रमांची माहिती आपल्या संकेतस्थळावर अपलोड करावी तसेच त्यासंदर्भात छायाचित्रे व अहवाल त्याच दिवशी राजभवनाकडे पाठविण्याच्या सूचना देखील विद्यापीठांना करण्यात आल्या आहेत.