Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

12.06.2018

चीनच्या वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपालांची भेट

भारतातील आपला कार्यकाळ समाप्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर चीनचे मुंबईतील वाणिज्यदूत झेंग क्षियुवान यांनी आज (दि १२) राज्यपाल चे विद्यासागर राव यांची राज भवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. मुंबईतील आपल्या साडेतीन वर्षांच्या कार्यकाळात राज्य शासनाकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल वाणिज्य दूतांनी महाराष्ट्राचे तसेच राज्यपालांचे आभार मानले. यावेळी क्षियुवान यांनी राज्यपालांना कैलाश शिखरावरुन आणलेले पवित्र जल भेट दिले.

 

वाणिज्यदूत झेंग क्षियुवान यांच्या पत्नी ली फॅन्घुही या देखिल यावेळी उपस्थित होत्या.