Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

24.05.2018

अर्जेन्टिना भारताशी सहकार्य दृढ करण्यास उत्सुक

अर्जेन्टिना भारताशी असलेले पारंपारिक व्यापार संबंध अधिक व्यापक करून सामरिक सहकार्य प्रस्थापित करण्यास उत्सुक असल्याचे अर्जेन्टिनाचे भारतातील नवनियुक्त राजदूत डॅनिएल चुबुरू यांनी आज येथे सांगितले.

 

चुबुरू यांनी गुरुवारी (दि. २४) राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.  

अर्जेन्टिनाचे भारताशी अणुउर्जा, तेल व नैसर्गिक वायू या क्षेत्रात सहकार्य सुरु असून अर्जेन्टिना अंतरिक्ष विज्ञान, पीक व्यवस्थापन या तसेच इतर क्षेत्रात सहकार्य वाढविण्यास उत्सुक आहे. अर्जेन्टिना आपला फुटबॉल खेळ भारतात आणण्यास तयार असून भारताला उत्तम फुटबॉल संघ तयार करण्यास मदत करू शकेल असे त्यांनी सांगितले. यावेळी अर्जेन्टिनाचे मुंबईतील वाणिज्यदूत अलेजान्द्रो झोथनर मेयेर उपस्थित होते.