Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

17.05.2018

राज्यातील पद्म पुरस्कार विजेत्यांचा गुरुवारी राजभवन येथे सन्मान

महाराष्ट्रातून यावर्षी पद्म पुरस्कार प्राप्त झालेल्या विविध क्षेत्रतील मान्यवरांचा राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांच्या हस्ते गुरुवारी (दि.१७) राजभवन येथे सत्कार करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम राजभवनातील जल विहार सभागृह येथे सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे.

 

पद्मविभुषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान, पद्मभुषण पंडीत अरिवंद पारिख, विज्ञान मुलांमध्ये लोकप्रिय करणारे पद्मश्री अरविंद गुप्ता, नाट्य-सिने कलाकार पद्मश्री मनोज जोशी, राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेता नदाफ इजाज अब्दुल रौफ यांसह इतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त लोकांना यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे.

 

वसंतराव नाईक कृषि संशोधन व ग्राम विकास प्रतिष्ठानतर्फे हा सन्मान समारोह आयोजित करण्यात आला आहे.

 

कार्यक्रमाला वसंतराव नाईक प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले, कार्याध्यक्ष अविनाश नाईक, सदस्य बकुल पटेल,  विनयकुमार पटवर्धन, मुश्ताक अंतुले, निलय नाईक तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. (संपर्क शशिकांत तुळवे, ८३५६८२४८६७)