Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

15.05.2018

अणु तंत्रज्ञानाच्या वापरात राष्ट्र अग्रणी - राष्ट्रपती राम नाथ कोविंद

महान्युज

अणु ऊर्जा विभागातर्फे

देशभरातील सुविधांचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन

अणु तंत्रज्ञानाच्या वापरात राष्ट्र अग्रणी

- राष्ट्रपती राम नाथ कोविंद

मुंबई, दि. 15 : ऊर्जा, कृषी आणि औषधोपचार या सारख्या सर्व विषयांमध्ये अणु तंत्रज्ञानाचा वापर करण्यात भारत एक अग्रगण्य देश म्हणून ओळखला जात आहे. सहा दशकांपूर्वी सुरु झालेला भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरचा हा प्रवास उल्लेखनीय आहे. अणू ऊर्जा विभाग आज संपूर्ण देशभर पसरलेल्या सुविधांमुळे बहुआयामी संस्था बनली आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज येथे काढले.

            अणू ऊर्जा विभागामार्फत देशभरातील विविध सुविधांचे आज राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते.

            यावेळी श्रीमती सविता कोविंद, राज्यपाल चे. विद्यासागर राव, शालेय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री विनोद तावडे, ऑटोमिक एनर्जी सेंटरचे अध्यक्ष सेकनार बासू, माजी अध्यक्ष डॉ. आर. चिदंबरम् आणि भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरचे संचालक के. एन. व्यास उपस्थित होते.

            राष्ट्रपती पुढे म्हणाले, आरोग्य, अन्न, कृषी आणि जलस्त्रोतांचे व्यवस्थापन तसेच पर्यावरण संरक्षण क्षेत्रात आण्विक तंत्रज्ञानाचा वापर करुन भारतीय शास्त्रज्ञांनी उल्लेखनीय काम केले आहे. राष्ट्र उभारणी ही दीर्घकालीन व सतत चालणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत अनेक आव्हाने आपल्यासमोर आहेत आणि म्हणूनच राष्ट्रीय विकास प्रक्रियेत अणु ऊर्जा विभागाची जबाबदारी महत्वपूर्ण आहे.

            यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते कल्पक्कम येथील मेटल फ्युएल पिन फॅब्रीकेशन फॅसिलिटी (आयजीसीएआर), हैद्राबाद येथील हाय पॉवर इलेक्ट्रॉन बीम मेल्टींग फर्नेस फॉर न्युक्लीअर ॲण्ड स्ट्रॅटेजिक अप्लीकेशन, ओरिसामधील तालचेर येथील एनरिच्ड बीएफ 3 गॅस जनरेशन फॅसिलिटी ॲट हेवी वॉटर प्लँट, भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर, मुंबई येथील इंटिग्रेटेड सेंटर फॅार क्रायसेस मॅनेजमेंट, नवी मुंबई येथील मल्टी लीफ कोलीमॅटोर सिस्टीम आणि ट्रॉम्बे छत्तीसगड दुबराज म्युटन्ट या तांदळाच्या नव्या प्रजातीचे लोकार्पण करण्यात आले.

            नवी मुंबई येथील मल्टी लीफ कोलीनेटर सिस्टीममुळे कॅन्सर रुग्णांना आजार असलेल्या नेमक्या ठिकाणी रेडीएशन थेरपी देता येणे शक्य होणार आहे. तर ट्रॉम्बे छत्तीसगड दुबराज ही कमी वेळात चांगल्या प्रतीचे उत्पन्न देणारा धानाचा प्रकार आहे. इंदिरा गांधी कृषी विश्व विद्यालय, रायपूर यांच्या समवेत तयार करण्यात आलेला तांदूळ यावेळी राष्ट्रपतींना भेट म्हणून देण्यात आला.