Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

08.05.2018

ह्रित्विका सरदेसाईचे भारोत्तोलन स्पर्धेतील यशाबद्दल राज्यपालांनी केले कौतुक

नुकत्याच उदयपुर येथे झालेल्या एशियन पावरलिफ्टिंग चाम्पियनशिप स्पर्धेच्या सब-ज्युनिअर महिला गटामध्ये प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या ह्रित्विका सरदेसाईचे राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी आज येथे अभिनंदन केले. ह्रित्विका खालसा महाविद्यालयाची प्रथम वर्षाची विद्यार्थिनी आहे.

 

ह्रित्विका सरदेसाईने आपले वडील तथा छत्रपती पुरस्कार विजेते कोच संजय सरदेसाई यांचेसोबत मंगळवारी (दि ८) राज्यपालांची राजभवन येथे भेट घेऊन त्यांना स्पर्धेत मिळालेली पदके आणि प्रमाणपत्रे दाखविली. राज्यपालांनी यावेळी ह्रित्विकाला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

दिनांक १ मे ते ६ मे दरम्यान उदयपुर (राजस्थान) येथे झालेल्या या स्पर्धेच्या ६३ किलोग्राम वर्ग गटात ह्रित्विकाने भाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये आशियातील पाच इतर देशातील स्पर्धकांनी देखील भाग घेतला असल्याची माहिती तिने यावेळी दिली. (संजय सरदेसाई 8691983111)