Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

14.04.2018

राजभवन कर्मचाऱ्यांतर्फे आयोजित आंबेडकर जयंती उत्सवाला राज्यपालांची भेट

राजभवनातील कर्मचाऱ्यांच्या विजय स्पोर्ट्स क्लबतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी भेट देऊन महामानवाला आपली आदरांजली वाहिली.

राज्यपालांनी सुरुवातीला भगवान बुद्धाच्या प्रतिमेला तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर राज्यपालांच्या उपस्थितीत भंते संघपाल म्हस्के यांनी प्रार्थना म्हटली.

राज्यपालांचे सचिव वेणुगोपाल रेड्डी तसेच एडीसी विंग कमांडर अजीत ढोकणे यांनी देखील डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली.

विजय स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष अशोक कांबळे तसेच पदाधिकारी प्रशांत उन्हावणे व मितेश रगडे तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.