Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

09.04.2018

मिशन शौर्यसाठी आदिवासी विदयार्थ्यांना राज्यपालांच्या शुभेच्छा


महान्यूज

मिशन शौर्यसाठी आदिवासी विदयार्थ्यांना राज्यपालांच्या शुभेच्छा

 

मुंबई दिनांक ९ - मिशन शौर्य या मोहिमेंतर्गत एव्हरेस्ट शिखर सर करण्याच्या मोहीमेवर निघालेल्या  आदिवासी आश्रमशाळेतील विदयार्थ्याना आज राज्यपाल चे.विदयासागरराव यांनी शुभेच्छा दिल्यात.राजभवन येथे आदिवासी विकास विभागाच्या वतीने आयोजीत कार्यक्रमात राज्यपालांनी मिशन शौर्यमध्ये सहभागी विदयार्थी विदयाथ्ीनीशी संवाद साधला.

 

यावेळी राज्यपालांचे सचीव बी.वेणुगोपाल रेडडी , आदिवासी विकास विभागाच्या प्रधानसचिव मनिषा वर्मा  व आदिवासी विकास विभागाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते

 दहा महिन्यांच्या खडतर प्रशिक्षणानंतर  मिशन शौर्य मध्ये  मनीषा धुर्वेप्रमेश आळेउमाकांत मडवीआकाश मडवीआकाश अत्रामशुभम पेंदोरकविदास कातमोडेविकास सोयामइंदू कन्नाकेछाया अत्राम हे आदिवासी कुटुंबांतील मुले-मुली जगातील सर्वोच्च शिखर  सर करण्याच्या मोहीमेवर निघाले आहेत.

शासनाच्या इतिहासात पहिल्यांदा आदिवासी विकास विभागामार्फत या पध्दतीच्या साहसी उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे प्रधानसचिव मनिषा वर्मा यांनी यावेळी सांगीतले.   विद्यार्थ्यांचा हा गट बुधवार दि.११ एप्रिल,2018 रोजी काठमांडूला प्रयाण करेल.  या मोहिमेच्या ह्या अंतिम टप्प्यासाठी त्यांच्याबरोबर सपोर्ट स्टाफ व व्यवस्थापकांबरोबरच १५ शेर्पाएक  तज्ञ डॉक्टर सहभागी होतील.

प्रशिक्षक बिमला नेगी देऊस्कर यांनीही प्रशीक्षणादरम्यानचा अनुभव सांगीतला.प्रमेश आळे व इंदु कन्नाके या विदयार्थ्यानी देखील मनोगत व्यकत केले. माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा ठाम निर्धार या मुलांनी त्यांच्या मनेागतातुन व्यक्त केला.राज्यपालांच्या हस्त्े यावेळी या विदयार्थ्याना स्मृतीचिन्ह देऊन्‍ गौरविण्यात आले.