Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

01.03.2018

राज्यपालांच्या रंगोत्सवानिमित्त शुभेच्छा

राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी राज्यातील जनतेला होळी तसेच रंगोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

 

देशात होळी तसेच रंगोत्सव साजरा करण्याची प्रथा हजारो वर्षांपासून सुरु आहे, ही प्रत्येक भारतीय व्यक्तीकरीता अभिमानाची गोष्ट आहे. रंगांच्या या उत्सवातून स्नेहभाव व मैत्रीचे बंध दृढ होऊन सामाजिक ऐक्य वृद्धिंगत होते. या आनंददायी सणानिमित्त मी राज्यातील सर्व नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.