Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

26.02.2018

राज्यापालांचे सभापती, अध्यक्ष यांना पत्र; अभिभाषणाच्या मराठी अनुवादाची व्यवस्था वेळेवर न झाल्याबद्दल नाराजी

राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी आज विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना तातडीने पत्र पाठवून विधानमंडळ येथे झालेल्या राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळी मराठी अनुवाद वाचनाची व्यवस्था न झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या गोष्टीची अत्यंत गांभीर्याने दाखल घ्यावी तसेच चुकीसाठी जबाबदार व्यक्तींविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी सूचना राज्यपालांनी आपल्या पत्रामध्ये केली आहे.