Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

07.02.2018

राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी घेतला मुंबई विदयापीठाच्या निकालांचा आढावा

राज्यपाल चे.विदयासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राजभवन येथे मुंबई विदयापीठाच्या हिवाळी परीक्षांच्या निकालाचा तसेच इतर अनुषंगिक विषयांचा विस्तृत आढावा घेतला. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे प्रामुख्याने उपस्थित होते.

आगामी उन्हाळी परीक्षांचे निकाल वेळेवर लागण्यासाठी करावयाच्या नियोजनाबाबत देखील यावेळी चर्चा झाली.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटेमाहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस.व्ही.आर.श्रीनिवासउच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सह सचिव सिध्दार्थ खरातमुंबई विदयापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. देवानंद शिंदेप्रभारी प्र-कुलगुरु डॉ. विष्णू मगरेआदी उपस्थित होते.

***